Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सोयगांव आठवडे बाजार ३१ मार्च पर्यंत स्थगित

दि . 23/03/2020

मालेगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी दर रविवारी सोयगाव येथे भरणारा आठवडे बाजार येत्या ३१ मार्च पर्यंत स्थगित ठेवण्यात आला असल्याची माहिती नगरसेविका सौ. जिजाबाई बच्छाव यांनी दिली.

जगभरात या कोरोना विषाणु मुळे जन सामानयात भितीचे वातावरणात निर्माण झाले आहे. सोयगाव परिसरात या विषाणूना अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी येत्या २२ व २९ मार्च रोजी सोयगावात भरविण्यात येण रा आठवले बाजार बंद करण्यात आला आहे.या कालावधीत शेतकरी व ग्राहकांनी बाजारात येऊ नये. प्रशासनाकडून होणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस पाटील कैलास बच्छाव यांनी केले आहे.


ताज्या बातम्या