Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावी जनता कर्फ्यु आदेशाचे उल्लंघन, हॉटेल मालकावर गुन्हा दाखल.

दि . 23/03/2020

.मालेगाव- जनता कर्फ्युचे आवाहन करण्यात आल्यानंतर संपूर्ण मालेगाव शहरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा  बंद असण्याचे आदेश असतांना देखील एका हॉटेलधारकाने जाणीवपूर्वक हॉटेल सुरू ठेवले म्हणून त्या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांचे पथक नवीन बसस्टँड परिसरात गस्त घालत असतानाच मिलन हॉटेलचे मालक शेख जाहीद शेख जाकीर ग्राहकांची गर्दी जमवून हॉटेलमधील खाद्यपदार्थ विक्री करतांना पोलिसांना आढळून आला. गर्दी टाळावी, हॉटेल्स बंद ठेवावे असे आवाहन करून देखील जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी मालकावर शहर पोलीस ठाण्यात पोलिस शिपाई विलास सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ताज्या बातम्या