Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावकरांनो सावधान; परदेशातून आलेल्या होम कोंरटाईन ओळखणार कसे, मालेगावात त्यांच्या हातावर शिक्काच नाही..

दि . 21/03/2020

मालेगाव मनपा आणि आरोग्य विभागास करोनाचे आणि शासनाच्या आदेशाचे गांभीर्यच नाही.

मालेगावात बाहेरच्या देशातून आलेल्या 48 लोकं आले असूनत्यांना  होम कोंरटाईन करण्यात आले आहे. एक संशयित रुग्णास मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे होम कोंरटाईन मध्ये असलेले काही संशयित बाहेर फिरत असून त्यांना हातावर शिक्का प्रशासनामार्फत मारण्यात येतो मात्र मालेगाव तसा शिक्काचं मारला जात नाही.हे लोकं शहरात इतरत्र फिरत असून होम कोंरटाईन असल्याचे कुणालाही लक्षात येत नाही.जर शासनाचे आदेश आहेत तर मालेगाव प्रशासनाने अद्यापही शिक्का कुणालाही मारला नाही त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास जबाबदार कोण...?

करोनाचे संशियत रुग्ण कुणाच्याही संपर्कात येऊ नये म्हणून राज्य सरकारने या रुग्णांच्या हातावर शिक्के मारले आहेत. तसेच काही रुग्णांना त्यांच्या घरातच ठेवले आहे. काही रुग्णांना रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. ज्या रुग्णांना घरात ठेवण्यात आले आहे, त्यांना बाहेर कुठेही फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. घरच्यांच्याही संपर्कात न येण्याच्या सूचनाही त्यांना करण्यात आल्या आहेत. परंतु मालेगावात याबबत कुठेही अंमलबजवणी मालेगावात होतांना दिसत नाही.


ताज्या बातम्या