Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या गाडीवर गोळीबार, थोडक्यात बचावलं कुटूंब

दि . 21/03/2020

बदलापूरचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष राम लिये यांच्या गाडीवर नेरळ गावाजवळ गोळीबार झाला. 

 बदलापूरचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष राम लिये यांच्या गाडीवर नेरळ गावाजवळ गोळीबार झाला.  दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी राम लिये यांच्या गाडीवर 3 गोळ्या झाडल्या. नंतर हल्लेखोर फरार झाले आहेत.  या हल्ल्यात राम लिये थोडक्यात बचावले. यावेळी गाडीत राम लिये त्यांचे कुटूंबही होतं. सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. नेरळ पोलिस घटनास्थळी पोहोचले असून  पुढील तपास करत आहेत.
मिळालेली माहिती अशी की, राम लिये यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याने ते आपल्या कुटुंबीयासह एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. तिथून परत येताना राम लिये नेरळ गावाजवळ पोहोचले असता त्यांच्या गाडीवर दोन दुचाकींवरुन आलेल्या चौंघानी गोळीबार केला. हल्लेखोरांनी राम लिये यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या.  सुदैवानं या घटनेत लिये आणि गाडीतील इतर कुणालाही काहीही इजा नाही.


ताज्या बातम्या