Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जनता कर्फ्यूः १००० विमानांची उड्डाणं रद्द!

दि . 21/03/2020

जगभर थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येत्या रविवारी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा प्रंतप्रधान नरेद्र मोदी यांनी केली आहे.  त्याच पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेकडून शनिवार २१ मार्चच्या मध्यरात्री पासून ते २२ मार्च रविवार रात्री १० वाजेपर्यत देशातील सुमारे २४०० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर रविवारी पहाटे ४ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यत अंदाजे १३०० इंटरसिटी गाड्यांची सेवा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लोकल सेवा सुरु असणार असून फक्त २० ते २५ टक्के फेर्‍या चालविण्यात येणार आहेत. j इंडिगो आणि गोएअरने जनता कर्फ्यूला पाठिंबा दिलाय. गोएअरने उद्याची सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. तर इंडिगोनची फक्त ४० टक्के उड्डाण होणार आहेत. दोन्ही कंपन्यांच्या निर्णयाने रविवारी १ हजार उड्डाणं रद्द होण्याचा अंदाज आहे. रद्द केलेल्या उड्डाणांच्या तिकीटांचे पैसे परत करण्याबाबत एकाही कंपनीने आश्वासन दिलेले नाही.

देशामध्ये मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, चैन्नई आणि सिकंदराबाद येथे उपनगरीय लोकल चालविण्यात येतील. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने लोकलच्या फेर्‍या कमी धावतात. त्यातच जनता कर्फ्यूमुळे या फेर्‍यांमध्ये आणखी कपात करण्यात यावी, असे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. अत्यावश्यक सेवांची वाहतुक करण्यासाठी जेवढ्या लोकलची आवश्यकता आहे, तेवढ्याच लोकलच्या फेर्‍या चालविण्यात याव्यात, असे स्पष्ट निर्देश रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेवर रविवारी जास्तीत जास्त २० ते २५ टक्के फेर्‍याच चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

रेल्वेतला आहार बंद
सर्व रेल्वे स्थानकांवरील फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम, जन आहार आणि सेल किचन बंद ठेवण्याचे आदेश आयआरसीटीसीने दिले आहेत. तसंच मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमधील कॅटरिंग सेवाही बंद ठेवण्याचे आदेश दिले गेलेत.


ताज्या बातम्या