Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
भारतात एका दिवसात 55 जणांना कोरोनाची लागण

दि . 21/03/2020

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अनेक शहर लॉकडाऊनच्या दिशेनं पावलं उचलत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई, 21 मार्च : जगभरात कोरोनाचा कहर सुरू असतानाच आता जी भीती होती तेच होत आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 8 दिवसांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 89 वरुन 250 पर्यंत पोहोचली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालयं, मंदिर, मज्जीत, गार्डन, जिमखाने बंद 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आणि लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण गेल्या 8 दिवसात वेगानं वाढल्याचं लक्षात आलं आहे. 13 मार्चला रुग्णांची संख्या 89 होती ती 24 तासांत 96 पर्यंत गेली होती. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अनेक शहर लॉकडाऊनच्या दिशेनं पावलं उचलत असल्याचं पाहायला मिळत आहे. बऱ्यापैकी अनेक शहरांमध्ये सरकारी वाहतूक वगळता दुकानंही बंद ठेवण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 50 हून अधिक आहे. त्यामुळे जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रील अनेक जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्ह्याधिकाऱ्यांनी घेतला आहे.


ताज्या बातम्या