Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
इगतपुरीत तृतीय पंथीयांन कडून हप्ता वसुली केली म्हणून एकाचा पोटावर चाकूने वार करून खून..

दि . 21/03/2020

इगतपुरी - शहरातील सिध्दार्थ नगर येथील रहिवासी युवराज चेंडू कर्टूले वय ३० वर्ष यास तेथिलच रहिवासी गोपीचंद भंडारी व त्याच्या साथीदारांनी युवराज यास हप्ता वसुली का केली या कारणा वरुन बेदम मारहाण करून चाकू सारख्या धारदार हत्याराने पोटावर वार करून जखमी केले असता त्यास नाशिक येथील डॉ.वसंत पवार मेडिकल कॉलेज येथे औषधोपचार करण्यासाठी भरती करण्यात आले परंतु औषधोपचार सुरू असताना तो मरण पावला.
सविस्तर वृत आसे की कल्याण ते इगतपुरी या दरम्यान रेल्वे गाड्यांमधुन तृतीय पंथी हे प्रवाशांना धाक दाखवून पैसे वसूल करतात आणि इगतपुरी रेल्वे स्टेशन जवळ येताच हे तृतीय पंथी पटापट चालती मेल / एक्स्प्रेस सोडतात आणि याच तृतीय पंथया कडून हे मयत व आरोपी हप्ता म्हणुन पैसे उकळत आसतात.याच कारणा वरुन दि.१९/३/२०२० रोजी रात्री ९-३० वाजेच्या सुमारास युवराज याच्या रहात्या घरा समोर आरोपींनी तृतीय पंथ्यांनकडून हप्ता का घेतला का घेतला म्हणून मारहाण केली व चाकू या धारदार शस्त्राने युवराज च्या पोटावर वार केले त्यात तो गंभीर जखमी झाला होता त्यामुळे त्यास औषधोपचारासाठी नाशिक येथील डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेज मध्ये दाखल केले त्या ठिकाणी उपचार सुरू असताना आज मरण पावला.या मुळे इगतपुरी पोलीस ठाण्यात गोपीचंद भंडारी,तावडी भंडारी व भूषण माळी यांचेवर गु.र.नं.२५/२०२० भा.द.वी कलम ३०२,३०७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाशिक जिल्हा ग्रामीण चे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी,ए.पी.आय अमोल खांडे,पो.ह.मारुती बोराडे, सचिन देसले, गणेश व-हाडे, विनोद गोसावी, वैभव वाणी करीत आहे


ताज्या बातम्या