Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावी कोरोना संशयित रुग्ण ...

दि . 21/03/2020

मालेगाव- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आता मालेगावात देखील कोरोनाचा एक संशयित रुग्ण आढळून आला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील हा रुग्ण असून त्याला शुक्रवारी( दि२०) शहरातील सामान्य रुग्णालयातील विशेष कक्षात दाखल करण्यात आले आहे.शुक्रवारी आढळून आलेला कोरोना संशयित रुग्ण २८ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान दुबई येथे होता. त्यानंतर तो मालेगावी परत आल्यावरशुक्रवारी पुन्हा सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळून आल्याने त्यास उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दोन दिवसानंतर तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधित रुग्ण कोरोना बाधित आहे की नाही हे स्पष्ट होईल.


ताज्या बातम्या