Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात पुन्हा गोळीबार; एकजण गंभीर जखमी, शहरातील मिल्लत मदरसा परिसरातील घटना..

दि . 20/03/2020

मालेगाव शहरातील मिल्लत मदरसा परिसरातील फार्मसी कॉलेज जवळ रस्त्याने जात असतांना एका टोळक्यामधिल एकाने फायरिंग केल्याची घटना झाली.जखमीचे नाव  मोहम्मद इस्तीयाक कलिम अहेमद असून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मालेगाव शहरात गोळीबारच्या घटना वाढल्या असून या दिड महिन्यातील हा पाचवा प्रकार असून नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
मागील आठवड्यात महेश नगर येथील एका माजी नगरसेवकाच्या घरी आठ राऊंड फायर केल्याने मालेगावात मोठे राजकीय वातावरण तापले होते.आता तर नागरिकांना भीती वाटायला लागली असून बाहेर निघणेही अवघड झाले आहे.


ताज्या बातम्या