Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ आरोपींना २ वर्षांची शिक्षा

दि . 20/03/2020

मनमाडचा नगरसेवकसह पानेवाडीच्या सरपांचाचा समावेश 

मालेगाव (प्रतिनिधी) :- राजकीय वैमनस्यातून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ आरोपींना येथील जिल्हा व अपर सत्र न्यायालयाने २ वर्ष कैदेची शिक्षा ठोठावली आहे. यात मनमाड नपा चा नगरसेवक संतोष आहिरे तसेच नांदगाव तालुक्यातील पानेवाडी ग्राप सरपंच शरद उर्फ सनी आहीरे याचा समावेश आहे.

नांदगाव तालुक्यातील मनमाड शहर येथे २१ 
ऑगस्ट २००७ रोजी सदर घटना घडली होती. या प्रकरणी सुमित बबन गायकवाड रा.मनमाड यांनी मनमाड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादी सुमित व त्याचे मित्र विजय मिस्त्रा, सनी जॉन मंत्री, अप्पा विठ्ठल भालेराव, अजय अहिरे रा.सर्व मनमाड हे मनमाड शहरातील तुफान चौक येथे गप्पा करीत असताना आरोपी संतोष पुंजाजी अहिरे रा.पंचवटी कॉलनी मनमाड, विनोद रामेश्वर शाहू, राजू प्रभू शिंदे, विशाल आनंदा सोनवणे, अविनाश बाळकृष्ण अहिरे, शंकर चावरिया, शरद उर्फ सनी अहिरे, यांनी तलवार व लाकडी दांडक्याने फिर्यादी व त्याचे साथीदार यांना जबर मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी मनमाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अंमलदार पोलिस उपनिरीक्षक अर्जुन इंधाटे यांनी गुन्ह्याचा तपास करून येथील न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. सहाय्यक सरकारी वकील एस.के.सोनवणे यांनी सरकारी पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासले व प्रखरपणे बाजू मांडून युक्तीवाद करून आरोपींविरुद्ध गुन्हा साबित केला.
या खटल्याचा काल दि.१६ मार्च रोजी जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश आर. एच.मोहम्मद यांनी निकाल घोषित केला असून वरील सर्व आरोपींना २ वर्ष कैदेची व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्यातील पैरवी अधिकारी पोलिस हवालदार शिरसाठ यांनी विशेष परिश्रम घेतले.


ताज्या बातम्या