Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




देवपुरपाड्याची माहेरवाशीण सोनाली बनली पोलीस उपनिरीक्षक

दि . 20/03/2020

घर प्रपंच आणि कुटुंबाचा सांभाळ करत सोनाली अहिरे यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाला दुसऱ्या प्रयत्नात गवसणी.

सोनालीने २०१८ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा  आयोगातर्फे झालेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात ओबीसी (महिला) २२वी रँक .

राकेश आहेर: मेशी लगत असलेल्या देवपूरपाडे ता.देवळा येथील दिलीप उत्तम अहिरे यांच्या कन्या सोनालीचे प्राथमिक शिक्षण ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालय येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण मेशी येथे घेतले. त्यानंतर येसगाव ता. मालेगाव येथे साने गुरुजी अध्यापक विद्यालय येथे डी.एड पूर्ण केले. शिक्षिका होण्याचे स्वप्न मनात बाळगले असले तरी शिक्षक भरती न झाल्याने तिथे निराशाच पदरी आली. त्यानंतर सोनालीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी एच पदवी मिळवली. 2013 मध्ये नांदगाव तालुक्यातील वाखारी येथील मेघराज काकळीज यांचे पुत्र ज्ञानेश्वर यांच्याशी विवाह झाला. वडील सैन्यात होते, तसेच पती पोलीस असल्यामुळे खाकीबद्दल त्यांच्या मनात आदर होता. पतीकडून मिळणारे मार्गदर्शन व प्रेरणा घेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सोनालीने सुरू ठेवला. घरची कामे आणि अभ्यास या दुहेरी कामांमुळे पहिल्या प्रयत्नात अपेक्षित यश मिळाले नाही. अभ्यासातील सातत्य व परिश्रम करण्याची जिद्द कायम ठेवत सोनालीने यशाला गवसणी घातली.सोनालीचे देवपुरपाडे येथील माहेरवाशीयांकडून तसेच मेशी येथील सोनालीच्या २०१० च्या १२वी च्या बॅचकडून कौतुक होत आहे.

शिक्षण होते; पण मार्गदर्शन नसल्याने लग्नानंतर पतींनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग दाखवला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पहिल्या प्रयत्नात यश आले नाही पण मी खचून गेले नाही. त्यानंतर संसारात अनेक अडचणींना सामोरे जात प्रयत्न सुरू ठेवले. माझ्या लहान मुलीला सांभाळून वेळ मिळेल तेव्हा अभ्यास सुरूच ठेवला आणि स्वप्नपूर्ती झाली. या यशात पती सासू-सासरे आई वडील भाऊ यांचे मोलाचे योगदान आहे. सोनाली अहिरे

सोनालीने तिच्या कर्तुत्वाने स्वतःला सिद्ध केले आहे कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून तिने यशाला आपलेसे केले. तिच्या या यशाबद्दल मला व माझ्या कुटुंबियांना तिचा सार्थ अभिमान आहे ज्ञानेश्वर काकळीज सोनालीचे पती


ताज्या बातम्या