Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
भायगाव - तरुणास मारहाण ६ जणांवर दंगलीचा गुन्हा...

दि . 20/03/2020

मालेगाव । शहरालगतच्या भायगाव शिवारातील पुष्प ताई हिरे नगरात तु आमचे विरुद्ध पोलीस ठाण्यात का केस करतो अशी कापत काढून ३९ वर्षीय तरुणास लोखंडी रॉडने डोक्यात मारुन दुखापत करणाऱ्या सहा जणांविरुद्ध वडनेर खाकुडी पो. ठाण्यात मार हाण व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
प्रकाश भीमराव शितोळे (३९) रा. शनिमंदिराजवळ, भायगाव यांनी फिर्याद दिली. प्रकाश बाबुराव शितोळे, शांता उर्फ लक्ष्मी विजय शितोळे, बाबूराव शितोळे, राहूल शितोळे, सर्जाबाई बाबूराव, शिला शितोळे सर्व रा. पुष्पाताई हिरेनगर यांनी फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी व मारहाण केली. तपास जमादार पवार करीत आहेत.


ताज्या बातम्या