Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव आरटीओतील कामकाज बंद...

दि . 20/03/2020

मालेगाव - राज्यात सर्वत्र करोनाचा विळखा वाढत असून, नागरिकांची गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कामकाज कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१मार्चपर्यंत अनुज्ञप्तीचे नुतनीकरण वगळता इतर संपूर्ण कामकाज बंद राहणार असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांनी सांगितले.

मालेगाव कार्यक्षेत्रातील ज्या अर्जदारांनी ३१ मार्चपर्यंत लर्निंग लायसन्ससाठी अपॉईंटमेंट घेतलेली आहे त्यांच्या आगाऊ वेळ रद्द करण्यात आली आहे. त्यांनी ३१ मार्चच्या पुढील वेळ घ्यावी. तसेच ज्या अर्जदारांनी ३१मार्चपर्यंत पक्के लायसन्स मिळावे यासाठी वेळ घेतलेली आहे त्यांनीही ३१मार्चनंतरच संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व नवीन वाहन नोंदणीचे कामकाज होणार आहे. तसेच सर्व मासिक शिबिरे ३१मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे.


ताज्या बातम्या