Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कांद्याची आवक वाढली ; बाजार भावात घसरण

दि . 18/03/2020

देवळा:- कांदा निर्यात बंदी खुली करुन तिन चार दिवस उलटले असुन ,कांदा निर्यातदारांनी आधिच निर्यातीसाठी खरेदी करून ठेवलेला कांदा काही प्रमाणात निर्यातीसाठी बाहेर पाठवायला सुरूवात केली आहे .परूंतु आखाती देश आणि आपल्या शेजारील देशांमध्ये कोरोणाच्या भितीमुळे व्यापारी व शासनाच्या सावध भुमीकेमुळे अपेक्षे पेक्षा कमी कांदा निर्यातीची शक्यता नाकारता येत नाही .सध्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक प्रंचड प्रमाणात वाढत असुन कांदयाच्या बाजार भावात दिवसेंदिवस २०० ते ३०० रुपंयाची घसरण सुरू आहे.यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अशीच आवक सूरू राहील्यास कांदा उत्तपादकांना मोठा फटका बसु शकतो .तो बसू नये या अनुशंगाने शेतकंऱ्यानी बाजार भावाचा विचार करता आपल्या उत्तपादीत मालाचा दर्जा बघुन कमित कमी कांदा विक्रिसाठी आणावा. कारण आवक ज्यास्त झाल्यास व्यापारी लुट भावात कांदा खरेदी करून साठवणुक करु शकतो .व भाव पडल्यावर शेतकरी बाजारात कांदा विक्रीसाठी आणणार नाही . तेव्हा कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण होउन खरेदीदार व्यापारी नफा कमवण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे कांदा उत्पादकांनी सावध राहुन टप्प्या टप्प्यात कांदा विक्रिसाठी आणावा असे आवाहन नाशिक जिल्ह्य कांदा उत्पादक संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी केले आहे.
दरम्यान ,आज बाजार समितीमध्ये लाल कांदा  कमीतकमी500,जास्तीतजास्त1300,सर्वसाधारण 1125 याप्रमाणे बाजार भाव होता . ऐकूण 200 ट्रॅक्टर , 20 बैलगाडीतून अंदाजे 4500 क्विंटल आवक होती .तर उन्हाळी कांदाल्या कमीतकमी 500, जास्तीतजास्त 1375,सर्वसाधारण 1200 असा भाव होता . याची आवक 82 ट्रॅकर 06 बैलगाडीतून अंदाजे 1500 क्विंटल आवक होती . कालच्या तुलनेत भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


ताज्या बातम्या