Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
धक्कादायक... कोयत्याने वार करुन पतीने केली पत्नीची निघृण हत्या; पंढरपूर तालुक्यात पतीनेच केला पत्नीचा खुन

दि . 18/03/2020

पंढरपूर - तालुक्यातील तुंगत येथे पत्नीच्या मानेवर कोयत्याने वार पतीने तिची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुंगत येथील विजया अशोक पवार (वय 45) या महिलेचा खुन तिचा पती अशोक पवार (वय 50) याने केला आहे.
मंगळवार दि. 18 मार्च रोजी पवार यांच्या घरी भाजीसाठी मटन आणले होते जेवण्याच्या आधी अशोक पवार याने दारु पिण्यासाठी आपली पत्नी विजया पवार यांच्याकडे पैसे मागितले. पत्नीने दारु पिण्यास पैसे न दिल्यामुळे अशोक पवार याने राहत्या घरीच आपली पत्नी विजया पवार यांच्यावर कोयत्याने वार करुन त्यांची निघृण हत्या केली. त्यांना दोन विवाहीत मुले, एक अविवाहित मुलगा असल्याचे समजते. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.


ताज्या बातम्या