Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोना मुळे महाराष्ट्रात लॉक डाऊन होईल का? वाचा लॉक डाऊन म्हणजे नेमकं काय?

दि . 18/03/2020

जगभरात आपल्या दहशतीने धुमाकूळ घालणारा कोरोना व्हायरस हा भारतात येऊन ठेपला आहे. भारताबरोबरच महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसने आता आपले पाऊल टाकण्यास सुरूवात केली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 39 वर पोहचली आहे. कोरोनाच्या भीतीने राज्यातील सरकारी, खासगी शाळांनी सुट्टी देण्यात आली आहे.

 राज्य सरकारने कोरोना व्हायरसबाबत खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणचे मॉल, सिनेमागृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, आणि इतर महत्वाचे ठिकाण बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहे. कोरोनाची राज्यात झपाट्याने वाढ होऊ नये म्हणून राज्य सरकारने आरोग्य प्रशासनाला खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र कोरोना व्हायरस राज्यात आटोक्यात आला नाही तर सरकार राज्यात लॉक डाऊनचा निर्णय घेईल का? या गोष्टीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. पण नक्की नेमकं लॉक डाऊन असतं तरी काय? लॉक डाऊन केल्यावर नागरिकांना कोणती खबरदारी घ्यावी लागते? सरकारच्या सुचना काय असतात? हे आपण जाणून घेणार आहोत.

लॉक डाऊन म्हणजे काय?
लॉक डाऊन हा शब्द अतिशय कमी वेळा अंमलात आणल्या जातो. एखाद्या परिस्थितीत नागरिकांच्या जीवाला जर परिसरात धोका निर्माण होत असेल तर राज्य सरकार त्या परिसरातील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करू शकतं. अन्यथा घराबाहेर न पडण्यास मज्जाव करू शकतं. हा निर्णय किती कालावधी करता घेण्यात येतो? किती काळ लागू केल्या जाऊ शकतो? याचे अधिकार फक्त सरकारलाच असतात. किंबहूना हे त्या ठिकाणच्या परिस्थितीवर अवलंबून असतं.
राज्यात लॉक डाऊन केलं जाईल का?
कोरोना व्हायरसने राज्यात धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत राज्यात जवळपास 39 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना व्हायरस दुसऱ्या टप्यात आहे असं स्पष्ट केले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉक डाऊन करण्याचा अजून कोणताही विचार सरकार करत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या जर वाढत गेली. आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास आरोग्य प्रशासनाला अपयश येत गेले. तर राज्य सरकार महाराष्ट्रातही लॉक डाऊन करण्याच्या सुचना देऊ शकतं. अशा वेळेस राज्यातील वाहतूक सेवा पुर्णपणे बंद करण्यात येऊ शकते. व्यापार ठप्प केल्या जाऊ शकतात. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला जाऊ शकतो. मात्र असे असले तरी अत्यआवश्यक सेवा जसे, रुग्णालये, औषधी दुकाने, अग्निशमक दल, रुग्णवाहिका सेवा, सुरूच राहतील.

जगभरात आतापर्यंत कुठे कुठे लॉक डाऊन?
कोरोना व्हायरसच्या विळख्यात जगातील बहूतांश देश सापडले आहे. चीन, इटली, जपान, अमेरिका, पाकिस्तान, आणि भारत यासारख्या देशांमध्ये कोरोनाने आपली दहशत पसरवली आहे. पाकिस्तानात तर एका दिवसात तब्बल 133 नागरिकांना कोरोना व्हायरची लागण झाली आहे. कोरोनाचा उगम चीनमधल्या वुहान शहरातून झाला. त्याठिकाणी सर्वात अगोदर लॉक डाऊन करण्यात आलं आहे. अशा वेळेस वुहानच्या नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन चीन सरकारने केले. त्याचप्रमाणे गरज पडल्यास वूहानच्या नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. वुहानमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती झाली होती. नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंचा तुडवटा निर्माण झाला होता. मात्र तरीही नागरिकांनी घरात राहणे पसंत केले होते. चीनबरोबरच इटलीमधील काही शहरांमध्ये सुद्धा लॉक डाऊन करण्याचा निर्णय त्या ठिकाणच्या सरकारने घेतला आहे.

 


ताज्या बातम्या