Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
एसटी बस अपघातात मोतीबाग नाका येथील दुचाकीस्वार ठार...

दि . 18/03/2020

मालेगाव येथील जुना मुंबई आग्रा रोडवरील ओवाडी नाला पुलानजीक गोरेगाव शिवारात एसटी बस ने समोरुन येणारी दुचाकीला ठोस मारुन तिचेवरील ४० वर्षीय सुरेश गजमल चव्हाण रा. मोतीबाग नाका संगमेश्वर यांच्या गंभीर दुखापतीस व मरणास कारणीभूत ठरणाऱ्या बस चालकावर पवारवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सकाळी साडेदहाचे सुमारास ही घटना घडली.
या घटनेची फिर्याद दाखल फकीरा जगताप (४२) रा. मोतीबागनाका भीमनगर यांनी पोलिसात दिली. एसटी बस क्र. एम एच २० बी एल २७२३ वरील चालक समाधान गोरखनाथ खैरनार (४०) रा. साने गुरुजी नगर मा. कॅम्प यांनी त्याचे ताब्यातील एसटी धुळे कडून मालेगावकडे भरधाव वेगात चालवून समोरुन दरेगावकडे जाणारी मोटार सायकल क्र. एम एच ४१ एवाय ७७५१ हीस ठोस मारुन तिचेवरील स्वार सुरेश गजमल चव्हाण यांचे डोक्यास, हातापायास गंभीररित्या दुखापत करुन त्याचे मरणास व दोन्ही वाहनाचे नुकसानीस कारणीभूत झाले म्हणून गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरीक्षक नाजीम शेख करीत आहेत.


ताज्या बातम्या