Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
गिरणा नदीपात्रात तरुणाला लुबाडून खंडणी मागणाऱ्या ४ जणांवर गुन्हा...

दि . 18/03/2020

मालेगाव गिरणा नदीपात्राजवळील भिकन शहा दर्गा येथे ४० वर्षीय इसमाला नदीपात्राकडे ओढून घेवून जावून त्यांना लोखंडी कटरचा धाक दाखवित अंगावरील कपडे काढून मोबाईलवर व्हिडीओ शुटकरुन खिशातून मोबाईल व रोख रक्कम असा २४०० रुपयाचा ऐवज बळजबरीने हिसकावून १ लाखाची खंडणी मागणाऱ्या अनोळखी चार भामट्यांविरुध्द छावणी पो. ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरणा नदी पत्रात रविवारी सायंकाळी सात ते रात्री आठ दरम्यान ही घटना घडली. 

या प्रकारणी एजाज अहमद जैनुल आबदीन (४०) रा. मोहनबाबा नगर, गुलशने मासूम या पावरलूम कामगाराने फिर्याद दिली. फिर्यादी हा त्याचा मुलगा दानियाल याला  पाहण्या साठी भिकन शहा दर्गा येथे जात असताना एक अनोळखी २१ ते २२ वर्षाचा इसम राजू नावाचा व त्याचे तीन साथी दार यांनी फिर्यादीचे कपडे काढून व्हिडीओ शुटींग करुन त्याचे खिशातील २ हजाराचा मोबाईल, ४०० रुपयाची रोकड बळजबरीने हिसकावून राजू नावाच्या तरुणाने एक लाखाची खंडणी दिली नाही तर तुझा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी दिली. म्हणून भादवि कलम ३९४, ३८५, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरीक्षक घुगे करीत आहेत.


ताज्या बातम्या