Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सोशल मैत्रीने निभावली सामाजिकता माळीनगर (दुंधे) शाळेला दिले मोफतस्पोर्ट ड्रेस 

दि . 17/03/2020

मालेगाव : दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत विविध उपक्रम राबवणारी शाळा म्हणून ओळख असलेली मालेगाव तालुक्यातील माळीनगर (दुंधे) शाळा प्रयोगशील शाळा म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे.येथील शिक्षक भरत पाटील यांची मुंबई येथील अभिजित काळे,वरिष्ठ अधिकारी,आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य यांच्याशी गेल्या काही दिवसांपासून फेसबुक माध्यमातून मैत्री जुळली होती.

 माळीनगर (दुंधे) शाळा सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करत शालेय उपक्रम व्हाटसअप, फेसबुकवर शेअर करत असते.त्याला प्रतिसाद म्हणून दप्तरमुक्त शनिवार यात विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस असावा हा मनोदय शिक्षकांना सोशल मिडियावर शेअर केला असता.अभिजित काळे यांनी आपल्या 'मैत्री जीवांचे - शिक्षण,सामाजिक संस्था' कडून  शाळेस स्पोर्ट ड्रेस पुरविले.विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती अन् क्रीडेविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशानेच त्यांनी माळीनगर शाळेस ड्रेस भेट दिले.मुंबई येथे विविध सामाजिक,शैक्षणिक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेच्यावतीने माळीनगर शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक राजेंद्र बधान यांनी संस्थेचे आभार मानले.यावेळी युवा शेतकरी अमोल रौंदळ,संजय रौंदळ,विनोद रौंदळ,गोरख बागुल,अरविंद जाधव,खुशाल रौंदळ,विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया : माळीनगर शाळेचे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सतत सोशल मिडीयावर पाहत असतो.शाळेची दप्तरमुक्त शनिवार संकल्पना आवडली व विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी,सक्षम भारत निर्माण व्हावा या उद्देशानेच थोडी मदत केली.
- अभिजित काळे,वरिष्ठ अधिकारी,आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य 

 


ताज्या बातम्या