Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
7 दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार; Coronavirus रोखण्यासाठी मोठा निर्णय

दि . 17/03/2020

मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढचे 7 दिवस सरकारी कार्यालयं बंद राहतील, असा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई, 17 मार्च : देशातल्या वाढत्या coronavirus प्रादुर्भावाचं महाराष्ट्र केंद्र बनत आहे. या जीवघेण्या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. शहरं बंद करायची का, वाहतूक व्यवस्था बंद करायची का याविषयी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये वाहतूक व्यवस्थेविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. पण पुढचे 7 दिवस सरकारी कार्यालय बंद राहतील, असा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची माहिती देणारं ट्वीट केलं आहे.


ताज्या बातम्या