Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
बागलाण मध्ये साग, चंदन तस्करी टोळींचा धुमाकूळ

दि . 17/03/2020

सटाणा - बागलाणमध्ये साग तस्करांच्या टोळीने आता डोकेवर काढले असुन राजरोस साग तस्करी सुरु असतांना आता चंदना चोरांची टोळी सक्रीय झाली आहे. वन विभागाच्या साल्हेर येथील निसर्ग परिचय केंद्रा लगत  असलेले पंचवीस ते तीस वर्षांची आठ चंदनाची झाडे दिवसा ढवळ्या चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे . चोवीस तास पाहरेकरी असलेल्या केंद्रा जवळून दहा ते बारा लाख रुपयांचे चंदनाची झाडे चोरून नेल्याने वन विभागाचे अधिकारी संशयाच्या भोवर्यात सापडले आहेत .बागलाण तालुक्यातील वन संपदा आणि वनक्षेत्रात चालणारी शासकीय कामे ठेकदार,तस्कर आणि वन यंत्रणा या त्रिकुटासाठी सध्या कुरण असल्याचे वेळोवेळी निदर्शनास येत आहे .गेल्या पंधरा दिवसांपूर्वी प्रसिद्ध डाबखलच्या जंगलात मोठ्याप्रमाणात सागाची तस्करी होत असल्याचे प्रसिद्धी माध्यमांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर वन विभाग खडबडून जागा होऊन पाच तस्करांना बेड्या ठोकल्या होत्या.ही घटना ताजी असतांनाच वन विभागाच्या साल्हेर येथील निसर्ग परिचय केंद्रालगत गेल्या पंचवीस ते तीस वर्षांची चंदनाची डेरेदार वृक्ष राजरोस तस्करांनी कत्तल करून चोरून नेले .या भल्या मोठ्या वृक्षांची किंमत बाजारात दहा ते बारा लाख रुपये आहे.ही तक्सरी होऊन आज आठ ते दहा दिवस होऊनही अद्याप कोणताही गुन्हा दाखल न केल्याने वन विभागाची यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे .वास्तविक घटना घडल्यानंतर तत्काळ पंचनामा करून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करणे आवश्यक होते .परंतु झाडे चोरी होऊन आठ ते दहा दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने तस्कर आणि वन यंत्रणा यांची अभद्र युती याच्या पाठीमागे काम करत असल्याचे बोलले जात आहे .


ताज्या बातम्या