Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
लोखंडी गज वाहतूक करणाऱ्या वाहनांचा बंदोबस्त करावा...

दि . 17/03/2020

मालेगाव । येथील लोखंड बाजार याठिकाणी मुख्य रस्त्यावर हमाल लोकांची मालवाहतूक गाड़ी लोखंडी गजे भरून तासंतास मुख्य रस्त्यावरती उभी राहते. व यामुळे या मुख्य रस्त्यावरती ट्राफिक ची गर्दी निर्माण होते. त्याचप्रमाणे या मुख्य रस्त्यावरून काकाणी विद्यालय व सरस्वती विद्यालयाचे शालेय लहान मुलं-मुली जीव मुठीत घेऊन ये-जा करतात.

या लोखंडी गजांमुळे मुलांना दुखापत होण्याची शक्यता असते. तसेच ट्रॅफिकमुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो .याबद्दल वारंवार तक्रारअर्ज करून देखील प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल अजून पर्यंत घेतलेली नाही. त्यामुळे प्रशा सना ला याबाबत लवकरात लवकर लक्ष घालून याविरुद्ध काही तरी पावले उचलावी असे आवाहन आजूबाजूच्या परिसरातील सर्व व्यापारी वर्गाकडून केले जात आहे.


ताज्या बातम्या