Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
तालुक्यातील दाभाडी शिवारात बिबट्याचा हल्ला,शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण ......

दि . 17/03/2020

मालेगाव तालुक्यातील दाभाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बिबट्याचा वावर असल्याची चर्चा होती. रविवारी ( दि.१५ मार्च ) दाभाडी शिवारात भरदुपारी बिबट्याने गायीच्या वासरूवर हल्ला केला. या हल्ल्यात वासरू जखमी झाले असून, शेतशिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. घटनास्थळी संध्याकाळी उशिरा पिंजरा लावण्याचे काम सुरू होते.

त्या बिबट्याचा वावर आधीपासूनच दाभाडी शिवारात बिबट्याचा वावर आधीपासूनच असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नुकत्याच गावानजीक असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेरात हा बिबट्या परिसरात वावरत असताना कैद झाला होता. बिबट्याचा वावर वाढल्याने शेतीवर राहणारे, काम करणारे मजूर यांच्यात भीती पसरली आहे. वनविभागाने वेळीच त्यास पकडावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
तालुक्यातील दाभाडी गावाजवळ मधुकर केवळ निकम यांचा मळा आहे. या ठिकाणी त्यांनी खळ्यावर गायी, म्हशी अशी पाळीव जनावरे बांधून ठेवलेली होती. रविवारी (दि. १५) दुपारी परिसरात वावर असलेल्या बिबट्याने अचानक निकम यांच्या शेतवस्तीवरील जनावरे बांधलेल्या गोठ्याकडे धाव घेत गोठ्यातील पाच दिवसांच्या वासरूवर हल्ला केला. वासराने जोरात हंबरडा फोडल्याने ओरडण्यास शेजारील शेतात काम करणारे समाधान गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी बिबट्याने त्यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी त्यांच्या मदतीला आजूबाजूचे शेतकरी धावून आल्याने बिबट्या तेथून पसार झाला. बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी झाले. बिबट्याने वासरावर हल्ला केल्याची वार्ता गावात पसरताच ग्रामस्थांनी निकम यांच्या शेतात गर्दी केली होती. यावेळी वनविभागाचे कर्मचारी व तलाठी यांनी भेट देत पंचनामा केला. जखमी वासरूवर पशुवैद्यकिय अधिकारी के. एस. शिंदे यांनी उपचार केले.


ताज्या बातम्या