Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
धुळे । पोलिसांनी वाचवले बँकेचे लाखो रुपये, दोन एटीएम फोडणाऱ्यांना पाठलाग करून पकडलं

दि . 15/03/2020

धुळे:- दोंडाईचा शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे चोरण्याच्या उद्देशाने एक चोरटा एटीएममध्ये घुसला, कुऱ्हाडीनेएटीएमची तोडफोड करत होता. याबाबतची माहिती दोंडाईचा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्या पथकाला रात्री गस्तीवर मिळाली. मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास गस्ती पथकाने घटनास्थळाकडे आपला मोर्चा वळवला. मात्र, पोलीस येत असल्याचे पाहून एटीएम फोडणाऱ्यांन धूम ठोकली. तो गल्लीबोळातून पळू लागला, पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. आरोपीचे नाव अशोक जगन बागुल (वय 35) धांडरे असं आहे.
पोलीस निरीक्षक राठोड यांनी खाकीचा धाक दाखवल्यानंतर चोरट्याने आपले तोंड उघडले. स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे या दोन्ही एटीएममध्ये लाखोंची रोकड होती. आरोपी त्यांच्या मसुद्यामध्ये यशस्वी झाला असता तर दोन्ही बँकेची लाखोंची रोकड त्याच्या हाती लागली असती. दोंडाईचा शहरात आत्ताच नवीन रुजू झालेले एपीआय राठोड यांचे चांगलेच कौतुक होत आहे.


ताज्या बातम्या