Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
देवळा येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

दि . 15/03/2020

देवळा:- शहरातील देवळा- कळवण रस्त्यावर झालेल्या  अपघातात दुचाकीस्वार राकेश भारत  मोरे (वय -28) रा . वाजगाव कामदेमळा ता. देवळा हा युवक जागीच  ठार झाला.आज शनिवार दि .14 रोजी सायंकाळी सात ते सव्वा सातच्या दरम्यान हा अपघात झाला.
देवळा येथून कळवण कडे  जाणारी टिव्हिएस कंपनीची दुचाकी ( क्र. MH 41. Z- 4836 ) येथील रामराव हाऊसिंग सोसायटी परीसरात रस्त्यालगत असलेल्या वीजेच्या खांबाला जोराने धडक दिली.दुचाकी चालक राकेश भारत मोरे रा वाजगाव ता.देवळा याच्या  डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो जागीच ठार झाला .त्याच्या पश्चात पत्नी ,आई वडील ,  दोन मुले असा परिवार आहे.
दरम्यान मयत राकेश मोरे यांच्या सख्या भाचीचे उद्या रविवारी  दि 15 रोजी लग्न आहे . या घटनेमुळे वाजगाव व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . देवळा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ,अधिक तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करीत आहेत . 


ताज्या बातम्या