Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
बिबट्याच्या हल्यात गोरा ठार;परिसरात भीतीचे वातावरण

दि . 15/03/2020

मेशी:-  मेशी त.देवळा येथे रात्री बिबट्याने  दत्तू शिवाजी कुवर यांचा तीन वर्षे वयाचा गोऱ्हा ठार केला. डोंगरगाव रस्त्यालगत असलेल्या वनविभागाच्या नर्सरीजवळ वनविभागाचे सुमारे ४०० हेक्टर क्षेत्र आहे.या घटनेच्या आदल्या रात्रीच डोंगरगाव येथील सुभाष देवराम सावंत यांच्याही वासरा वर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यातही वासरु मृत्युमुखी पडले आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच मेशी येथील पोलीस पाटील हेमंत पगार  यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व सदर प्रकार वन विभागाला कळवला असता वनरक्षक वंदना खरात  घटनास्थळी भेट दिली व सदर घटनेचा पंचनामा केला.
 


ताज्या बातम्या