Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
राज्यातील माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नींना घराच्या मालमत्ता करात सूट...

दि . 15/03/2020

मुंबई, दि. 14 : राज्यातील माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नींना घराच्या मालमत्ता करात सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत जाहीर केला. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींना मालमत्ता कर सूट योजना जाहीर करण्यात आली असून यासाठी राज्याचे माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या निर्णयाचा राज्यातील सुमारे अडीच लाख माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींना लाभ होणार असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

भुसे यांच्याकडे माजी सैनिक कल्याण विभागाचा देखील पदभार असून या विभागाच्या पहिल्याच आढावा बैठकीत त्यांनी माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नी यांना मालमत्ता करातून सुट देण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यानुसार बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नी यांना मालमत्ता करात सूट योजना लागू करण्याचा निर्णय वित्तमंत्री अजित पवार यांनी काल अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना विधानसभेत जाहीर केला होता. या निर्णयानुसार शहरी व ग्रामीण भागातील सुमारे 2 लाख 50 हजार माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींना मालमत्ता करातून सूट मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका व महापालिका यांनी स्वच्छेने माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींच्या मालमत्ता कराचा भार स्वत: स्विकारावा व ज्या संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही त्यांच्यावरील आर्थिक भाराची प्रतिपूर्ती ग्रामविकास व नगरविकास विभागामार्फत करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.भुसे यांनी सांगितले. या निर्णयाबद्दल मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. नगरविकास आणि मा.ग्रामविकास मंत्र्यांचे कृषीमंत्री भुसे यांनी आभार मानले आहेत.


ताज्या बातम्या