Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
दाभाडी सरपंचांच्या गैरव्यवहारा निषेधार्थ ३० मार्च रोजी आयुक्तालयासमोर उपोषण

दि . 15/03/2020

मालेगावा तालुक्यातील दाभाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. चारुशिला अमोल निकम यांच्या गैरव्यवहाराबाबत शासकीय अहवाल सादर करूनही त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यास विभागीय आयुक्तांकडुन कालहरण केले जात असल्याच्या निषेधार्थ येत्या 30 मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालया समोर उपोषण आंदोलन करण्याचा इशारा जि.प.च्या दाभाडी गटाच्या सदस्या सौ. संगिता संजय निकम, दाभाडीचे उपसरपंच सुभाष आहिरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे. 

यासंदर्भात सो, संगिता निकम यांचेसह ग्रा.पं. सदस्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत सरपंच सौ.चारुशिला निकम यांनी केलेल्या गैरव्यवहाराची कागदपत्रे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनास दिलेला अहवाल सादर केला. दाभाडीच्या सरपंच म्हणून निवडून आलेल्या सो. लोकनियुक्त निकम यांनी ग्रामपंचायतीचा कारभार आपल्या मनमानीने चालविला आहे. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता त्यांनी अनेक बेकायदेशीर कामे केल्याचे पुरावे प्रसार माध्यमांना यावेळी देण्यात आले. शासनाच्या शौचालय अनुदानातही त्यांनी लाभण्याच्या अनुदानातुन मोठी रक्कम हडप केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मासिक सभेत बहुमत नसतांनाही अनेक प्रस्ताव त्यांनी आपल्या मर्जीने मंजुर करून शासकीय निधीचा अपहार केला आहे. अपंगासाठी असलेला निधी इतर ठिकाणी खर्च करणे, अनुसुचित जाती-जमार्तीना देण्यात येणा-या लाभातील काही रक्कम हडप करणे, जलयुक्त शिवार योजनेतील वाळू अपहार, मर्जीतील ठेकेदारास काम देणे, बेकायदेशीर निविदा मंजुर करणे असे अनेक प्रकार त्यांनी केले आहेत.
यात सुमारे 60 लाखाहन अधिक रकमेचा अपहार प्रकरणी जि. प. सदस्या सौ. निकम, उपसरपंच सुभाष आहिरे व ग्रामपंचायत सदस्य यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर तक्रारी केल्या आहेत. जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस.भुवनेश्वरी यांनी याबाबत सरपंच सौ.निकम यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे केली आहे. मात्र अहवाल येत्या 30 मार्च रोजी नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर उपोषण आंदोलन करण्याचा निर्धार जि. प.सदस्या, व उपसरपंच सुभाष आहिरे व ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे, यावेळी दादाजी सुपारे, संजय निकम, सौ. सरेखा निकम, अविनाश निकम, ग्रा.पं. सदस्या भावना निकम, सोनाली निकम, विदया निकम आशाबाई निकम, संगिता किशोर निकम, निळकंठ निकम आदीसह दाभाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.


ताज्या बातम्या