Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
तरुणाच्या खिशातील ५ हजाराचा मोबाईल हिसकावणारा अटकेत...

दि . 15/03/2020

संगमेश्वर मोतीबाग नाका येथून रस्त्याने पायी चालणाऱ्या तरुणाच्या खिशा तील ५ हजार किमतीचा मोबाईल  हॅन्डसेट बळजबरीने हिसकावून पळून जाणाऱ्या मुसद्दीक उर्फ मुसा अहमद खुर्शीद अहमद (२५) रा. बजरंगवाडी या भामट्यास छावणी पोलीसांनी अटक केली आहे.

बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची फिर्याद समीर रमेश मोरे (२१) रा. सावता नगर संगमेश्वर यांनी पोलीसात दिली. फिर्यादी हा नाशिक येथून एसटीबसने मोतीबागनाका येथे उतरुन घराकडे पायी चालत असताना गिरणा पुलाकडून मोटारसायकलीवर ट्रिपल शीट बसलेल्या भामट्यांपैकी मधोमध बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या खिशातील ५ हजाराचा ओपो-ए ५ एस कंपनीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला होता. या प्रकरणी पोलिसांनी मुसद्दीक उर्फ मुसा याला पहाटेच्या सुमारास अटक केली. पुढील तपास उप निरीक्षक आखाडे करीत आहेत.


ताज्या बातम्या