Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
एसटी बसची दुचाकीला ठोस महिला ठार; चालक जखमी...

दि . 15/03/2020

मालेगाव । सटाणारोड वरील आघार बु।। शिवारात एसटी बसने दुचाकीला ठोस मारुन तिचेवरील ३० वर्षीय महिलेच्या मरणास कारणीभूत ठरणाऱ्या सटाणा येथील बस चालक सचिन शांताराम माळी याचे विरुद्ध वडनेर खाकुडी पो. ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी सहाचे सुमारास ही घटना घडली. 
या घटनेची फिर्याद मयत महिलेचा दिर भाऊसाहेब भिला आहिरे (३६) रा. लखमापुर यानी पोलिसात दिली. फिर्यादी व त्याची भावजई मयत सिमा गोरख आहिरे (३०) रा. लखमापूर ता.सटाणा हे मोटारसायकल क्र.एम एच ४१ बी ए ८९८६ हीचे वरुन मालेगाव येथे जाण्यासाठी सटाणारोड येत असताना आघार बु।। शिवारात एस टी बस क्र. एमएच १४ बीटी ४०७८ वरील ड्रायव्हर सचिन माळी याने भरधाव वेगात हयगयीने वाहन चालवून फिर्यादीच्या मोटारसायकल ठोस मारुन अपघात करुन सीमा आहिरे यांच्या मरणास व फिर्यादीच्या दुखापतीस कारणीभूत झाला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार राऊत करीत आहेत.


ताज्या बातम्या