Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करणारा अटकेत...

दि . 13/03/2020

देवळा -  येथील सायबा हॉटेल मागे राहाणारे दिलीप मुरलीधर आहेर (३३) या शेतकऱ्याला मारहाण करीत बळजबरीने राउंडअप नावाचे विषारी औषध पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फिर्यादीचा नातेवाईक मुरलीधर शिवाजी आहेर (३६) याला देवळा पोलीसांनी अटक केली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली.
पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून भादवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करुन बुधवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास अटकेची कारवाई केली. याप्रकरणी फिर्यादी दिलीप आहेर यांनी दिलेल्या जबाबात मुरलीधर आहेर याने दारुच्या नशेत घरी येवून फिर्यादीच्या चारित्र्याचा संशय घेवून शिवीगाळ मारहाण करीत घरातील किचन रुममध्ये खाली पाडून फिर्यादीचे छातीवर पाय देवून बळजबरीने त्याचे तोंडात विषारी औषध पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून भादवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करुन बुधवारी रात्रीच्या सुमारास अटकेची कारवाई केली.


ताज्या बातम्या