Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
महेश नगर गोळीबार प्रकरणी माजी आमदाराचे काका खलील दादांना अटक..

दि . 12/03/2020

मालेगाव : शहरातील महेश नगर गोळीबार प्रकरणी माजी आमदार आसिफ शेख यांचे काका माजी स्थायी समिती सभापती खलील शेख यांना पोलिसांनी रात्री अटक केली होती. व आज न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने पोलीस तपासात पोलिसांच्या हाती काय आजू लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. २७फेब्रुवारी रोजी मध्य रात्री दोन जणांनी माजी नगरसेवक प्रा.रिजवान खान यांच्या घरावर गोळीबार केला होता. आता पोलिसांनी खलील शेख यांना अटक करण्यात आल्याने मालेगाव शहरात मोठ्या चर्चांना उधान आलेले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी 3 लोकांना अटक केली होती. काल या तिघांना न्याया लयाने तिघांना न्यायालय कोठतीत रवाना कऱण्यात आले. इमरान खालीद शेख उर्फ इमरान बाचक्या,  इरफान इस्माईल सैय्यद व अश्पाक शाह यांना अटक केलेल्या आरोपींची नावे होती. त्या तिघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने तिघांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी आमदार मुफ्ती इस्माईल यांनी या हल्ल्याची चौकशी व्हावी आणि मास्टर माईंड अटक व्हावा अशी मागणी केल्याने पोलिसांनी आपली चक्रे गतिमान करत गोळीबार प्रकरणी माजी आमदार आसिफ शेख यांचे काका माजी स्थायी समिती सभापती खलील शेख यांना पोलिसांनी रात्री अटक करण्यात आल्याने मालेगावात होणाऱ्या घटांनाच्या तपासात नवी दिशा मिळणार कि काय ? असा असा सवाल उपस्थित होत आहे.


ताज्या बातम्या