Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोना जागतिक महामारी घोषित, WHO ने केली घोषणा

दि . 12/03/2020

नवी दिल्ली:- चीन, ईरान आणि इटलीमध्ये महामारी बनलेल्या कोरोना व्हायरसला जागतिक आरोग्य संघटनेने महामारी घोषित केले आहे. करोना व्हायरस जगातील 100 देशांमध्ये पसरला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 4 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) करोना व्हायरसने जगात महारोगराई पसरल्याचं घोषित केलं आहे. यासोबतच या कोरोनाविरोधात संपूर्ण जगाने एकजुज होऊन लढा द्यावा. असे आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलं आहे. भारतातही झपाट्याने रुग्णांची संख्या वाढत आहे.
'आमच्या मूल्यांकनानुसार COVID-19 आता जागतिक महामारी बनला आहे. संपूर्ण जगात पसरत असलेल्या या व्हायरसमुळे आरोग्य संघटनाही चिंतेत आहे. या व्हायरसने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे.'
आता महाराष्ट्रातही कोरोनाने पाऊल ठेवले आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते. आता त्या पाठोपाठ नागपुरातही कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा समजली आहे.


ताज्या बातम्या