Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
महापालिकेची करवसुलीसाठी जप्ती मोहीमेत सुजन चित्रपट सह तीन मालमत्ता सील...

दि . 11/03/2020

मालेगाव शहरातील महापालिकेच्या कॅम्प-संगमेश्वर प्रभाग क्रमांक एकच्या कार्यालयाने मालमत्ता करवसुलीसाठी जप्ती मोहीम सुरु केली आहे. सोमवारी सुमारे साडेसोळा लाख रुपये थकबाकी वसुलीसाठी बंद पडलेल्या मोसमपुल भागातील सुजन चित्रपटगृहासह तीन मालमत्तांना सील ठोकण्यात आले. आयुक्त किशोर बोर्डे यांच्या आदेशान्वये जप्ती कारवाई सुरु झाली आहे.

सुजन चित्रपटगृहावर नऊ लाख रुपये मालमत्ता करापोटी थकबाकी होती. कॉलेज स्टॉप भागातील कल्पार्क हॉटेल व्यवस्थापनाकडे पाच लाख, तर भायगाव शिवारातील जिग्नेश पटेल यांच्याकडे एक लाख ४३ हजार रुपये थकबाकी होती. प्रशासन- नाने सोमवारी या तिन्ही मालमत्तांना सील ठोकले.जप्ती कारवाई व अन्य खर्च संबंधित मालमत्ताधारकांच्या नावे टाकला आहे. मालमत्ता सील केल्यानंतर थकबाकी वसुलीची पावती व प्रभागाचे सील मालमत्तेवर ठोकण्यात आले. सहाय्यक आयुक्त राहूल मर्धेकर, प्रभाग अधिकारी सुनील खडके, मालमत्ता करवसुली लिपिक जावीद अन्सारी, जनार्दन खैरनार, चंद्रकांत इंगळे, ज्ञानेश्वर पवार आदींनी ही कारवाई केली. आगामी काळातही ही मोहीम सुरु राहणार आहे.


ताज्या बातम्या