Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




पुण्यात कोरोनाचा शिरकाव: दोन रुग्ण पॉझिटिव्ह, तातडीनं उपचार सुरू

दि . 10/03/2020

कोरोना व्हायरसचे दोन संशयित रुग्ण सोमवारी पुण्यात आढळून आलेत. पुण्यात दोन रुग्ण आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रुग्णांना तातडीनं पुण्यातल्या नायडू हॉस्पिटल दाखल करण्यात आले आहे.

पुणेः कोरोना व्हायरसचे दोन संशयित रुग्ण सोमवारी पुण्यात आढळून आलेत. पुण्यात दोन रुग्ण आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रुग्णांना तातडीनं पुण्यातल्या नायडू हॉस्पिटल दाखल करण्यात आले आहे. त्यांना येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. हे दोघंही रुग्ण दुबईहून परतलं आहे. त्यापैकी एका रुग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत आहेत. तर दुसऱ्या रुग्णामध्ये अद्याप लक्षणं आढळून आलेली नाहीत. 
होळी, धुळवड, तुकाराम बीज तसेच गावोगाव भरणाऱ्या यात्रा आणि ऊरुसांच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनानं केलं आहे. होळी सण आपल्या कुटुंबियांसोबतच साजरा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
दरम्यान दोघांवर त्यांच्या लक्षणांवर आधारित उपचार सुरू झाले आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. तसंच धुलिवंदनाचा सण साजरा करताना होणारी गर्दी नागरिकांनी टाळावी. सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता पाळावी. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवावा. मास्क ऐवजी तोंडाला रुमाल वापरावा, अशी सतर्कता बाळगावी, असं आवाहनही आरोग्यमंत्री यांनी केलं आहे.
पुण्यातलं एक दाम्पत्य 1 मार्चला दुबईवरुन पुण्यात आलं. एका ट्रॅव्हल एजन्सीमार्फत ते दुबईला फिरणयासाठी गेले होते. दुबईतून पुण्यात आले त्यावेळी त्या दोघांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. मात्र घरी गेल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्यानं हे दाम्पत्य तपासणीसाठी महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यानंतर या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. 

दरम्यान या दोघांसोबत दुबईला जे 40 जण होते. त्यातल्या कोणाच्याच टेस्ट केल्या नसल्याचं पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं सांगितलं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत दुबईला गेलेल्या इतर 40 जणांच्याही टेस्ट कराव्या लागणार आहेत.त्याचबरोबर कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले हे दाम्पत्य गेल्या आठ दिवसांमध्ये ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले असतील अशा सर्वांचा शोध घ्यावा लागणार असल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे.

 


ताज्या बातम्या