Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
तालुक्यातील झोडगे स्टेट बँक शाखेचा भोंगळ कारभार...

दि . 10/03/2020

मालेगाव - स्टेट बँकेच्या झोडगे शाखेचा कारभार अवघे तीन कर्मचारी सांभाळत आहेत. त्यामुळे ग्राहकांना तासनतास प्रतिक्षा करावी लागते. ग्राहक सेवेचा बोजवारा उडाला असुन अतिरिक्त कर्मचारी नियंक्ती व बँकेच्या कामात 15 दिसांत सुधारणा न झाल्यास ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिपक पवार यांनी दिला आहे.

झोडगे माळमाथ्यावरील मध्यवर्ती ठिकाण असुन 40 गावांची बाजारपेठ आहे. 40 गावांमध्ये विविध योजनांचे भाभी कर्जदार, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार, सर्वसामान्य, दिव्यांग आदीचे खाते स्टेट बँकेत असल्याने ग्राहकांची गर्दी असते. बैंक उपन्यापूर्वीच बैंकेसमोर मोठे सातेदार जमा होतात.पवार यांनी येथे भेट दिली असता,ग्राहकांनी अडी अडचणींचा पाढा वाचला मुळात तीन कर्मचारी आहे.त्यात आजारपण, रजा, सुट्या, खासगी कामांमुळे आठवड्यातुन एकदा कर्मचारी सुटी घेतो. त्यामुळे कामाचा ताण वाढतो, असे ग्राहकानी सांगितले. तक्रारी एकल्यानंतर पवार यांनी ग्राहकांसह शाखा व्यवस्थापक प्रदिप जाधव याच्याशी चर्चा केली वरिष्ठ अधिका-यांना कळवुन येथे अतिरिक्त कर्मचारी नेमावेत अन्यथा बँकेची अन्य शाखा सुरु कराच्या प्रस्ताव पाठवावा असे त्यानी सांगितले. जाधव यांनी येथील समस्या वरिष्ठ कार्यालयात कळविल्याचे सांगितले एटीएममध्ये खडखडाटाबद्दलही ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. तात्काळ उपाययोजना न झाल्यास ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा पवार व ग्राहकांनी दिला.


ताज्या बातम्या