Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अल्पबचत एजंट च्या डोळ्यात मिरची पूड फेकून पैशाची बॅग लंपास...

दि . 10/03/2020

मालेगाव - बारा बंगला भागातील मोतीभवन जवळ राहाणारे अल्पबचत प्रतिनिधी विशाल विजय कबाड (३४) यांच्या राहात्या घरासमोर तीन अनोळखी भामट्यापैकी एकाने फिर्यादी विशाल यांच्या डोळ्यात मिरची पुड फेकून २५ हजाराची रोकड पिग्नी मशिन असा एकुण ३५ हजार १०० रुपयाचा ऐवज बळजबरीने हिसकावून पोबारा केल्याची घटना शनिवारी रात्री नउच्या सुमारास घडली.

या प्रकरणी छावणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विशाल कबाड हे मालेगाव मर्चंट बँक व गोविंद दुसाने पतसंस्थेची अल्पबचतीची दिवसभराची रक्कम जमा करुन घरी बारा बंगला येथे कम्पौंडचे गेट उघडत असताना एक असम तोंडाला  रुमाल बांधलेला अचानक फिर्यादी जवळ येवून त्यांचे डोळ्यात मिरची पूड टाकून फिर्यादीच्या हातातील पैशाची  बॅग बळजबरीने हिसकावून थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या पांढरा रंगाच्या मोपेड गाडीवर बसलेल्या दोन भामट्यांसोबत पळून गेला. तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.


ताज्या बातम्या