Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




अयोध्येत श्री राम मंदिराचे ३० एप्रिल रोजी भूमिपूजन

दि . 09/03/2020

अयोध्येत उभारण्यात येणार्‍या श्री राम मंदिराचे 30 एप्रिल रोजी भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती गोविंदगिरी महाराज यांनी रविवारी अहमदनगर येथे दिली. येत्या ४ एप्रिल रोजी अयोध्येत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक होणार असून त्यावेळी भूमिपूजनाबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, ३० एप्रिल रोजीच भूमिपूजन सोहळा पार पडेल, अशी आजची स्थिती आहे, असेही स्वामी म्हणाले.
अयोध्येतील वादग्रस्त भूमिखाली राम मंदिरच असल्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीेम कोर्टाने दिला होता. त्यानंतर राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला होता. गोविंदगिरी महाराज म्हणाले, श्रीराम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांची 4 एप्रिल रोजी अयोध्येत बैठक होईल.
राम मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान व संघाचे सरसंघचालक उपस्थित राहतील. राम मंदिराला सर्वात आधी शिवसेनेने नव्हे तर तिरुपती देवस्थानने शंभर कोटी घोषित केले आहेत. त्यांनी निधी दिला, त्याचे स्वागतच आहे. राम मंदिराचा आधीचा आराखडा हा जुना आहे. त्यात मंदिराच्या भव्यतेनुसार बदल करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
त्यात 30 एप्रिल रोजी मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम निश्चित करण्यावर शिक्कामोर्तब होईल. संपूर्ण मंदिर हे पाषाणाचे बनविले जाणार आहे. त्यासाठी किती खर्च येईल हे चार एप्रिल रोजी आकडा ठरेल. मंदिर भव्य असेल. ते केवळ मंदिर नसेल तर जगाची सांस्कृतिक व संस्काराची राजधानी होईल. प्रत्येक राज्याचे भवन तिथे उभारले जावे, असाही प्रयत्न असेल.
राम मंदिरामधून प्रत्येकाला जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल. तसेच या मंदिरात रामलल्लाच्या जुन्या मूर्तीसह नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. राम मंदिर ट्रस्टकडून अयोध्येत खाते उघडण्यात येणार असून, त्यात ऑनलाईन निधी संकलन होणार आहे, असे गोविंदगिरी महाराज म्हणाले.


ताज्या बातम्या