Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पाच लाख ३० हजारांची रोकड चोरणाऱ्या कामगारास अटक...

दि . 09/03/2020

मालेगाव । पैशाच्या लालसे पोटी मालकाचे पाच लाख ३० हजार रुपये लंपास करणाऱ्या कामगारास छावणी पोलिसांनी अटक केली.चोरीचा प्रकार उघड होऊ नये सीसीटीव्ही म्हणून कॅमेऱ्याची दिशा बदलताना दुसर्या कॅमेऱ्यात त्याच्या हालचाली कैद झाल्याने चोरीचे बिंग फुटले. संशयित कमलनाथ श्रावण सूर्यवंशी यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मालेगाव येथे कॅम्परोडवर विंचूरकर डायनास्टिक सेंटर आहे. या इमारतीच्या वरच्या मजल्यावर शंतनू पवार यांचे वास्तव्य आहे. गेल्या आठवड्यात ते कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. शुक्रवारी (दि.६) ते घरी परतले तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आहे. चोरट्याने कपाट तोडून पाच लाख ३० हजार रुपये लंपास केले होते. घटनेची माहिती मिळाल्याने कॅम्प विभागाचे पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, छावणीचे पोलिस निरीक्षक प्रवीण वाडिले यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
चोरीचा प्रकार संशयास्पद वाटल्याने माहितीगार व्यक्तीच्या सहभागाकडे पोलिसांचे लक्ष वेधले गेले. इमारतीच्या परिसरात सीसीटीव्हीची पाहणी केली. यात चोरटा कैद झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी तातडीने संशयित कमलनाथ सूर्यवंशीचा शोध सुरू केला. त्याचा मोबाइल बंद असल्याने माहिती मिळत नव्हती. अखेर तो द्याने येथे घरात लपून बसल्याचे समजताच त्याला ताब्यात घेण्यात आले. प्लॉट खरेदीसाठी आपणच पैसे चोरल्याची कबुली त्याने दिली. मारुती कारमध्ये लपवून ठेवलेले पाच लाख २९ हजार रुपये त्याने पोलिसांना काढून दिले. याप्रकरणी शंतनू जयंत पवार यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.


ताज्या बातम्या