Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
चव्हाण परिवाराचे अज्ञात व्यक्तीने लंपास केले १ लाख रूपये,चोरीचा छडा लागत नसल्याने शेतकरी कुटुंब चिंतेत

दि . 08/03/2020

देवळा:- वरवंडी ता. देवळा येथील शेतकरी यशवंत तानाजी चव्हाण यांचे एक लाख रुपये बुधवार (दि.२६) रोजी अज्ञात व्यक्तीने लंपास केले, परंतु अद्याप या चोरीचा छडा लागत नसल्याने हे शेतकरी कुटुंब चिंताग्रस्त आहे. कष्टाने मिळवलेले एक लाख रु. हातोहात चोरट्यांनी लांबवल्याने त्यांच्या पुढील खर्चाचे नियोजन विस्कटले आहे. याबाबत तपास करण्यात येऊन हे चोरीला गेलेले पैसे परत मिळवून द्यावेत अशी या कुटुंबाची मागणी आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वरवंडी ता.देवळा येथील यशवंत तानाजी चव्हाण यांनी बुधवारी (दि.२६) रोजी कळवण मर्चंट बँकेतून एक लाख रु बचत खात्यावरून काढले. त्यानंतर बसस्थानकाकडे जात असताना कुणीतरी अंगावर टाकलेली घाण साफ करण्यासाठी पायरीवर बसले  असतांना एका भामट्याने ही पैशांची पिशवी लंपास केली. याबाबत सीसीटीव्ही टीव्ही फुटेज वर सदर दृश्य कैद झाले आहे. तरी याबाबत तपास करत या भामट्याला शोधत ही कष्टाची रक्कम परत मिळवून द्यावी आणि यासाठी पोलिसांनी तपास करावा अशी या कुटुंबाची मागणी आहे. 
शेतकरी शेतात कष्ट करतो आणि चोरटे या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारतात ही अत्यंत दुःखद आणि मनाला वेदना देणारी बाब आहे. मायबाप पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चा आधार घेऊन या घटनेचा तपास करावा.यशवंत चव्हाण वरवंडी ता. देवळा


ताज्या बातम्या