Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
गांधीनगरात कपडा मार्केटमध्ये चोरी करणाऱ्या महिलांवर गुन्हा...

दि . 08/03/2020

मालेगाव । आझादनगर भागातील बापू गांधीनगर कपडा मार्केट मधील कपड्याचे दुकान मधून सहा हजाराची रोख रक्कम व १० हजार ८०० रुपये किमतीचे १२ लेडीज ड्रेस मटेरियल असा एकुण १६ हजार ८०० रुपयाचा माल चोरुन नेणाऱ्या नाजीया शेख इस्त्राईल (२९) रा. आझाद नगर या महिलेसह तिच्या दोन साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

फिर्याद दुकान मालक निसार अब्दुल खालीक शेख (४५) रा.नया आझाद नगर गनं.३ यांनी फिर्याद दिली. तपास आझाद नगर पो. ठाण्याचे पो.ना. गरुड करीत आहेत.


ताज्या बातम्या