Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जनता विद्यालय मेशी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

दि . 08/03/2020


ता.८/३/२०२०
देवळा प्रतिनिधी राकेश आहेर  महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ महिलांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा केला जातो.
      हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली जिजाऊंनी शिवरायांना भारी, पुत्रास पाठीला बांधून स्वातंत्र्यासाठी लढल्या लक्ष्मीबाई रणरागिनी, शेण चिखल अंगावर झेलून स्त्री शिक्षणासाठी झटलेल्या सावित्रीबाई. यांच्या प्रतिमेचे पूजन करून जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मेशी येथे महिला दिनास सुरुवात करण्यात आली व विविध कार्यक्रम घेण्यात आले.
    या प्रसंगी रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.महिला आरोग्य मार्गदर्शन, महिला सबलीकरण इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले, यावेळी केन्द्रप्रमुख श्री. पाटिल सर(केंद्र- मेशी), श्री. मोरे सर(केंद्र- देवळा), श्री. बैरागी सर (केंद्र- पिंपळगाव) प्राचार्य शिक्षक व विद्यार्थी  उपस्थित होते.


ताज्या बातम्या