Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव - दुचाकी बसवर आदळून १ ठार, १ जखमी....

दि . 08/03/2020

मालेगाव । मुंबई- आग्रा महामार्गावर धुळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तैय्यब हॉटेल समोर रस्ता ओलांडणारी मोटारसायकल एसटी बसवर आदळून झालेल्या भीषण अप घातात एक तरुण जागीच ठार तर एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना काल दुपारी बाराच्या सुमारास घडली.
या अपघात प्रकरणी समजलेली हकिकत अशी की, येथील रॉयल फार्मसी कॉलेजात दिसणारे दोन विद्यार्थी धीरज (रा.वसई मुंबई) आणि त्याचा मित्र शांतनू (रा. सिन्नर) हे हिरोहोन्डा मोटारसायकलीने रॉयल फॉर्मसी कॉलेजात जात असताना क्रॉसींगवर एसटी बसची ठोस लागुन धीरज नावाचा तरुण जागीच ठार झाला तर पाठीमागे बसलेला शांतनू हा गंभीररित्या जखमी होवून त्याचेवर एका खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहे. या घटनेची खबर मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला आहे.


ताज्या बातम्या