Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सलाम-अपंगतत्व आणि सोबत परित्यक्तेचे जीवन अश्या खडतर परिस्थितीवर धैर्याने मात; मालेगावच्या भारती जाधव यांनी चक्क स्टेअरिंग धरून मुलांना शाळेत ने- आण करण्याचे काम

दि . 08/03/2020

अपंगतत्व आणि सोबत परित्यक्तेचे जीवन अश्या खडतर परिस्थितीवर धैर्याने मात करीत मालेगावच्या भारती जाधव यांनी चक्क चार चाकी वाहनांची स्टेअरिंग हाती धरून मुलांना शाळेत ने- आण करण्याचे काम करून स्वावलंबनाने आई व आपला उदरनिर्वाह भागवित आहे.   

या आहेत भारती जाधव वयाच्या १३ वर्षीच त्यांना हाताला अपंगतत्व आले अनेक उपचार करूनही त्याचा उपयोग झाला नाही उलट त्यांच्या दोन्ही हाताचे बोटांची हालचाल होत नाही. विशेष म्हणजे अपंगतत्वामुळे त्यांना साडी व केसही करता येत नाही त्यांच्या आई  सोनुबाई जाधव या भारतीला साडी नेसविण्याचे व केस करून देतात. मात्र असे असतांना त्यांनी उदरनिर्वाहसाठी बँकेकडून कर्ज काढून चार चाकी घेतले व मुलांना शाळेत ने – आण करण्याचा  व्यवसाय सुरू केला.त्यासाठी त्यांनी सुवातीला चालक ठेवला. मात्र चालक लहरीपणामुळे बँकेचे हफ्ते थकायला लागल्याने शेवटी त्यांनी स्वत:च वाहन चालविण्याच्या धाडसी निर्णय भारती जाधव यांनी घेतला.त्यांच्या संघर्षापुढे त्यांचे अपंगत्व आलेले हातही हारले आणि त्या चालक झाल्या सफाईदारपणे चार चाकी वाहन चालवू लागल्या. त्यांचे वाहन चालविण्याचे कौशल्य पाहून त्यांना वाहन चालविण्याचा परवाना मिळाला.आज चार वर्षापासून चार चाकी वाहनातून मुलांना शाळेत व घरी सोडण्याचे काम करतात एवढ्यावरच भारती जाधव थांबत नाही तर सायंकाळी  मालेगावच्या सोमवार बाजारात आई बरोबर उसन विक्रीचा व्यवसाय करतात.  

⇒ पालक प्रतिक्रिया 

भारती जाधव यांच्या अपंगतत्वामुळे सुरवातीला पालक त्यांच्या वाहनातून मुलांना पाठवित नव्हते. मात्र त्या डगमल्या नाही. त्यांनी आपल्या कामात सातत्य  ठेवले. सुरक्षित वाहन चालवून मुलांची काळजी घेत त्यांना आपुलकीने त्या शाळेत सोडविण्याचे काम पाहून आता पालक निर्धास्तपणे त्यांच्या वाहनातून मुलांना शाळेत पाठविण्यासाठी प्राधान्य देतात.-  वृषाली, पालक

 

पदरी आलेले अपंगतत्व व परितक्तापणा एकटेपणा याला कवटाळत न बसता भारती जाधव यांनी धैर्याने त्याचा सामना केला.त्यासाठी त्यांनी चार चाकी वाहन चालविण्याचा व्यवसाय  स्वीकारला.त्या मालेगावच्या पहिल्या महिला अपंग चालक ठरल्या. जागतिक महिला दिनानिमित्त भारती जाधव यांच्या संघर्षमय वाटचालीस सलाम.-- संदीप नेरकर, पालक


 


ताज्या बातम्या