Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोना व्हायरसची ऑफर, 100 रुपयात 3 कोंबड्या

दि . 07/03/2020

धुळे:- कोरोना व्हायरसच्या भीतीने नॉनव्हेज प्रेमींनी चिकनकडे पाठ फिरवल्याने, चिकन विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. आणि आता अशा परिस्थितीमध्ये तोटा पत्करून देखील चिकन विक्रीचा धंदा सुरू ठेवण्यासाठी नागरिकांना ज्याप्रमाणे आठवडे बाजारामध्ये होलसेल विक्रेते आपली वस्तू विकण्यासाठी व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या ऑफर्स देतात, त्याचप्रमाणे आता चिकन विक्रेत्यांनी देखील चिकन विकण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे.
गावा गावांमधील आठवडे बाजारामध्ये जाऊन शंभर रुपयाला दोन किंवा शंभर रुपयाला 3 अशा पद्धतीने बाजारात चक्क कोंबड्यांनी भरलेले ट्रक व ट्रॅक्टर उभे करून जोरात अनाउन्समेंट करून कोंबड्यांची विक्री केली जातेय. हा प्रकार धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील आठवडे बाजारात दिसून आला. चिकन प्रेमींनी या अनोख्या ऑफरचा मोठ्या प्रमाणात लाभ घेताना दिसून आले, चिकन प्रेमींनी चक्क विक्रेत्यांवर भोवती मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केल्याचे दिसले. चिकन विक्रेत्यांच्या अनोखी शक्कल ची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.


ताज्या बातम्या