Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मुंगसे येथे शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कार्यालायाला ठोकले टाळे ; कनिष्ठ अभियंतासह पाच जणांना शेतकऱ्यांनी कोंडले..

दि . 07/03/2020

मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील शेतकर्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले असून गेल्या अनेक दिवसापासून विद्युतप्रवाह सुरळीत होत नसल्याने शेतात उभ्या असलेल्या पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. कांदे, डाळींब ,गहू, हरबरा व इतर पिके उन्हाच्या तडाखा वाढल्याने पाणी देणे गरजेचे असून विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकाला शेतकऱ्यांना सोडावे लागेल. या वर्षी निसर्गाने भरपूर साथ देऊनही महावितरणाच्या गलथान कारभारामुळे पिकांना पाणी पुरवठा करणे शक्य होत नसल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या वर्षी शेतकर्यांना दुष्काळाने मारले होते. आता तर या महावितरणाच्या गलथान कारभारामुळे पाणी असून देखील पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याने गेल्या महिन्याभरापासून अनेक निवेदन देऊन देखील कोणत्याही प्रकारची कारवाई महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून होतांना दिसत नसल्याने तोंडाशी आलेल्या घासाला मुकावे लागत असल्याने वैतागून मुंगसे येथील शेतकऱ्यांनी शेवटी हतबल होऊन येथील कार्यालयालयातील  कनिष्ठ अभियंता व कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवी ची उत्तरे दिल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी कार्यालयाला टाळे ठोकले.

चार तासानंतर प्रशासनाला जाग आल्यानंतर मालेगावचे महावितरणचे उप कार्यकारी अभियंता यांनी  येत्या काही दिवसात विद्युत पुरवठा सुरळीतपणे करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.  

 


ताज्या बातम्या