Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
संशयामुळे पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या

दि . 07/03/2020

मुंबई - गोंदिया शहरात पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेवून पतीने आपल्या हत्या केल्याची घटना घडली आहे. सुमन मनोज सावनकर (28)असं मृत महिलेचे नाव आहे.
पती मनोज झनकलाल सावनकर याने आपल्या लहान मुली समोर आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला आहे याप्रकरणी पोलिसांनी मनोजला अटक केली आहेत. मनोज हा पत्नी सुमनच्या चारीत्र्यावर संशय संशय घेत होता. दररोज घरात तो वाद घालत होता. आज क्षुल्लक कारणावरून त्याने पोटच्या मुलीसमोर पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर ही घटना लपविण्यासाठी मनोज पत्नीला स्वत: दवाखान्यातही घेवून गेला होता. डॉक्टरांनी सुमनला मृत घोषित केल्यानंतर मनोजने तिला मृत अवस्थेत घरी आणुन ठेवले होते. आणि त्यानंतर तो पसार झाला होता परंतु पोलिसांनी शोध घेवुन मनोजला अटक करण्यात आली आहे. 


ताज्या बातम्या