Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा

दि . 07/03/2020

मुंबई:- महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर केला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांनी सकाळी 11 वाजता विधानसभेत हा अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. राज्यातील जनतेला या अर्थसंकल्पाकडून मोठया अपेक्षा आहेत.
- 3254 कोटींचा निधी विविध कृषी आणि मत्स उद्योगांसाठी देण्यात येणार
- कोळंबी उत्पादन प्रकल्पासासाठी जास्तीच्या सुविधा दिल्या जातील
- रेशीम उद्योगासाठी देणार अनुदान - अजित पवार
- गोड्या पाण्यात मतस्योत्पादनाला चालना मिळावी यासाठी केले जाणार प्रयत्न- अजित पवार
- भूजल पातळी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री जलसंधारण योजना राबवली जाणार. यासोबतच जलसंपदा विभागासाठी 10 हजार 35 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
- नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे.
- सर्व घटकांचा विकास व्हावा असा आमचा मानस आहे. 
- अजित पवार यांची मोठी घोषणा, 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांनाही मिळणार मोठा दिलासा
- उर्वरित शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अगोदर रक्कम दिली जाईल 
- कर्जमाफीसाठी एकूण २२ हजार कोटी रुपयांचा निधी, शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याचं काम सुरू 
- सरकारने शेतकऱ्यांना सुटसीट आणि जास्त कागदपत्र आणि हेलपाटे घालायला न लावता कर्जमाफी दिली आहे. या योजनेमध्ये सर्व बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे
- केंद्राकडून निधी वेळेवर न मिळणं, मर्यादित उत्पन्न स्रोत हे लक्षात घेऊन प्रत्येक घटकाच्या अपेक्षा पूर्ण आमची जबाबदारी आहे 


ताज्या बातम्या