Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावी दोघांकडून गावठी कट्टा जप्त...

दि . 07/03/2020

मालेगाव । शहरातील गोळीबाराच्या घटनेनंतर गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी शहरातील विविध भागात कोम्बिंग व नाकाबंदी सुरु केली आहे.बुधवारी मध्यरात्री रमजानपुरा भागात पोलिसांनी दोघांकडून गावठी कट्ठा व काडतुस जप्त केले.

या मोहिमेदरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अशपाक शाह (वय 22, रा. रमजनापुरा) याला अटक केली. त्याच्या जवळ कट्टा व कातुस मिळून आले. चौकशीत त्याने हा कहा मोहंमद सलीम उर्फ सलीम काल्या (30, रा.हजार खोली, यांच्याकडून आणल्याची माहिती दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार वसंत महाले, पोलीस शिपाई राकेश उबाळे, चेतन संवत्सकर, पोलिस शिपाई कुंदन अहिरे, विपीन ठाकूर, कृष्णदास गवळी व शशिकांत शिरोळे, आदींनी केली. दोघांविरुद्ध रमजानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


ताज्या बातम्या