Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
फोन-पे चालेना, अनेक वापरकर्ते चिंतातूर येस बँकेवरील निर्बंधांचा फटका

दि . 06/03/2020

नवी दिल्ली - आरबीआयने येस बँकेवर गुरुवारपासून निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांचा फटका आता  फोन-पे  या पेमेंट सर्व्हिस पुरवणाऱ्या अ‌ॅपलाही बसला आहे. आपली सेवा तात्पुरत्या काळासाठी बंद असल्याचे  फोन-पे  ने एका ट्विटमध्ये सांगितले आहे. फोन पे अ‌ॅपची येस बँक ही पार्टनर बँक आहे.

आमची सेवा तात्पुरत्या काळासाठी बंद आहे. अनियोजित देखभाल क्रिया सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे होणाऱ्या गैरसोईबाबत आम्ही दिलगीर आहोत. आम्ही लवकरच पुन्हा सेवा सुरू करू.  अशा आशयाचे ट्विट फोन-पे ने केले आहे.
आरबीआयने दिलेल्या निर्देशांनुसार, गुरुवारपासून येस बँकेवर निर्बंध लादण्यात आले आहेत. बँकेवर असणाऱ्या कर्जाच्या बोजामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आरबीआयने दिली. या निर्बंधांनुसार, या बँकेच्या खातेदारांना केवळ ५० हजारांपर्यंतची रक्कम आपल्या खात्यातून काढता येणार आहे. एका महिन्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
यासोबतच, या एका महिन्यासाठी येस बँक कोणालाही नवे कर्ज देऊ शकणार नाही, किंवा कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाही. तसेच, एसबीआयचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांची बँकेच्या प्रशासकपदी निवड करण्यात आली आहे.
महा  अर्थ : आमदार फंडात ३ कोटीपर्यंत वाढ, तर राज्यात पेट्रोल-डिझेल महागणार
या निर्णयानंतर खातेदारांनी आपापल्या खात्यामधील पैसे काढण्यासाठी एटीएमबाहेर रांगा लावल्या होत्या. बँकेने याआधी कोणतीही सूचना न दिल्यामुळे, तसेच एटीएममध्येही पैसे उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे.


ताज्या बातम्या